"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

1.     गावाविषयी माहिती

तलासरी खंबाळा  हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक   प्रगतशील ऐतिहासिक गाव आहे. तलासरी गावात दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे तलासरी या गावाला पूर्वी माल असेही संबोधले जात होते, सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २६३२ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , अंगणवाडी केंद्रे व्यायामशाळा १,सभामंडप- तसेच मंगल कार्यालय १ समाज मंदिरे अशी शैक्षणिक शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत तलासरी खंबाळा ने  ग्रामस्थांसाठी  प्रधानमंत्री जल जीवन मिशन योजना राबविलेले असून गावातील नागरिक व  कुटुंब   पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच   गावाच्या आजूबाजूस गावदेवी मंदिरे वाघ्या मंदिरे आहेत  तसेच सामुदायिक सभागृह, , सार्वजनिक विहिरी शेततळी अशा धार्मिक सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून  भात, नागली, उडीद, ज्वारी आणि तूर ही  पिके घेतली जातात. भात नागली या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना खाण्यापुरते उत्पन्न मिळते.

तलासरी खंबाळा ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तलासरी खंबाळा गावाने लाभार्थ्यांना शौचालय बांधून दिले आहेत . प्रधानमंत्री जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

तलासरी खंबाळा गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

2. भौगोलिक स्थान

तलासरी खंबाळा हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेले आहे.  ग्रामपंचायतीमध्ये महसूल गाव  आहेत. एकूण ६०१कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २६३२ आहे.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन अल्प  प्रमाणात आहे.तसेच गावालगत अवघ्या किमी  गावाच्या आजूबाजूस ओढे पावसाळी आणि हिवाळी काही दिवस वाहत असतात . येथे हवामान मोसमी  आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

3. लोकजीवन

तलासरी खंबाळा गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात नागली उडीद ज्वारी खुरासनी पिके घेतली जातात हंगामी भाजीपाला पिके काही प्रमाणावर घेतली जातात.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गावदेव, रवाळ, मखर देव,गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

तलासरी खंबाळा च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

5. संस्कृती परंपरा

तलासरी खंबाळा गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दर पाच वर्षांनी मखर देव उत्साहात साजरा केला जातो दर दोन वर्षांनी रवाळ देव साजरा केला जातो, तसेच बारश्या , गावदेव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे तलासरी खंबाळा गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

 प्रेक्षणीय स्थळे:-

ग्रामदैवताचे मंदिरगावातील प्रमुख जागृत गावदेवी मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

हनवतगावाच्या मध्यवर्ती तलासरी गावात असलेले हे पुरातन काळातील मंदिर ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.

शेती क्षेत्र  – तलासरी खंबाळा भात नागली उडीद खुरासणी उत्पादनासाठी चांगले ठिकाण आहे. गावातील हिरवीगार शेते, शेती च्या हंगामात पहाण्याजोगे  आहे.

7. जवळची गावे

तलासरी खंबाळा हे गाव जव्हार तालुक्यातील शेवट आणि दादरा व नगर हवेली या या केंद्रशासित प्रदेशाच्या लगत  असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे तलासरी खंबाळा सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

खेडपा, चालतवड, कोरतड , बरवाडपाडा हि गावे तलासरी खंबाळा आसपासची प्रमुख गावे आहेत.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


601
1087
533
554

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo